श्री बाळ गणेश मंडळाच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व वृक्षारोपण

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
          येथील श्री राम मंदिर जवळील श्री बाळ गणेश मंडळाच्या वतीने दि २३सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू निदान शस्त्रक्रिया शिबिरास सुरुवात झाली यात २२५ रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करुन ३० वृक्षांची लागवड उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

         सविस्तर वृत असे की श्री ची स्थापना झाल्यापासून शहरात विविध गणेश मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत,त्या अनुषंगाने श्री बाळ गणेश मंडळाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजता मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू निदान,शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २२५ रुग्णाच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली, त्यापैकी २४ रुग्णांच्या डोळ्याची शत्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.यावेळी सोसायटीचे माजी चेअरमेन साईनाथ उत्तरवार यांच्या संकल्पनेतून या गणेश मंडळाने शहरात ३० वृक्षांची लागवड करून वर्षभर संगोपन करण्याची जबाबदारी घेतली आहे.
         यावेळी डॉ लक्ष्मण चंदनकर, डॉ गंगाधर कसबे,डॉ इकबाल शेख यांच्या टीमने नेत्र तपासणी केली तर सोसायटीचे माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार,सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले,माजी उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ प्रशांत सब्बनवार, इंजि संतोष चव्हाण,सोसायटी मॅनेजर राम रत्नागिरे,प्रा अरविंद बोधनकर,डॉ नरेश बोधनकर, संतोष शिवशट्टे, अशोक गायकवाड, शिवराम कोलंबरे ,दिगंबर लाडे,प्रा सुरेश पेंटावार,आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बाळ गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या