बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन

(मुंबई प्रतिनिधी: महेश कदम)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या भीम अनुयायींकरीता ‘चर्मोद्योग कामगार सेना’ अध्यक्ष श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजीत करण्यात आले.

अवघ्या देशातून येणाऱ्या हजारो भीम अनुयायींनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख श्री. महेश सावंत, विभाग संघटिका सौ. श्रध्दा जाधव, साईनाथ दुर्गे, भटू अहिरे, सीमा लोकरे, महेश यादव, विनोद सातपुते यांच्या सह महिला व पुरुष पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या