पाचपिंपळीत गंगाबाई रावसाहेब पाटिल पाचपिंपळीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व नेत्र बिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]

बिलोली तालुक्यातील मौजे पाचापिंपळी येथील गंगाबाई रावसाहेब पाटिल पाचपिंपळीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व नेत्र बिंदू शस्त्रक्रिया शिबिर दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता गंगाबाई पाटील नर्सिंग स्कुल पाचपिंपळी येथे घेण्यात आला. ४५० रुग्णांची तपासणी करून त्यापैकी ५६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठवले आहे. त्यासोबतच हिवाळा असल्यामुळे रुग्णांना चादरीचे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबीरात दंत तपासणी, औषधी उपचार व येथे आलेल्या नागरीकांना लसीकरण करण्यात आले.
सदरिल मोफत नेत्र तपासणी व नेत्र बिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित कार्यक्रमात पाचपिंपळीचे माली पाटील तथा श्री.साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आनंदराव रावसाहेब पाटील यांनी आपल्या हस्ते गंगाबाई पाटिल ‘मातोश्री’ यांच्या प्रतिमेचे पुष्प पुजन केले. मोफत नेत्र तपासणी व नेत्र बिंदू शस्त्रक्रिया शिबिर ‘व्हिजन फाउंडेशन इंडिया’ उदयगिरी लायन्स नेतृ रुग्णालय उदगीर व श्री.साई शिक्षण संस्था पाचपिंपळी ता.बिलोली यांच्या संयुक्त विद्यमानाने सातत्याने १४ वर्षापासुन घेतल्या जात आहे.
या माध्यमातून बिलोली तालुक्यातील गोर गरिब वृध्द नागरिक व माता भगीनी यांनी शिबिराचा लाभ घेतल्यामुळे दृष्टी मिळवली असल्याचे बोलले जात आहे. या शिबिराचे नियोजन करणााऱ्या लोकांचे वृध्द नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत. या नेत्र तपासणी शिबिरासाठी तीन दिवसां करिता रुग्णाकडून १५०० रुपये घेऊन ही सुविधा दिली आहे.
या शिबिरासाठी संस्थेचे सचिव शिवाजी पा.पाचपिंपळीकर, सरपंच कमल किशोर पा.पाचपिपळीकर यांनी परिश्रम घेतले.  सदरिल शिबिरात माली पा.आनंदराव पाचपिंपळीकर, अशोक पा.तळणीकर, शंकर यंकम, दिलीप पा.पांढरे, प्रविण पा.हरनाळीकर, मारोती.पा.गागलेगावकर, धोंडीबा कपाळे, पांडूरंग रामपूरे, सय्याराम निदाने, गणेश जोगदंड, सौरभ गुडमेवार, डाॅ.पांचाळ मॅडम, शंकर जाधव, पांचाळ आदी जण उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या