आदर्श शेतकरी पूरस्काराने फैसल शहाबुद्दीन गिते सन्मानीत !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
म्हसळा: रायगड प्रेस क्लब आयोजित आदर्श शेतकरी पूरस्कार सन २०२२ म्हसळा येथे तालुका प्रेस क्लब वतीने रायगडचे लोकप्रिय खासदार मा श्री सुनिलजी तटकरे यांच्या हस्ते पूरस्कार प्रदान करण्यात आले.
सध्या धावपळीच्या, दगदगीच्या दिवसांत शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला शेतीमाल असो वा वेगवेगळे उद्योग किंवा कोणताही पूरक व्यवसाय असो, उत्पादित केलेल्या मालाचे मार्केटिंग करणे , बाजारपेठ मिळवणे काळाची गरज असल्याचे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा येथे व्यक्त केले.
 रायगड प्रेस संलग्न, म्हसळा तालुका प्रेस कल्बच्यावतीने पाभरा येथील आंबा बागायतदार फैसल गीते आणि ढोरजे येथील भाजीपाला उत्पादक महेंद्र गिजे, मनिषा गिजे या शेतकऱ्यांचा सन्मान खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी ते बोलत होते.
         या कार्यक्रमाला तालुका नेते अलिशेट कौचाली ,तालुका अध्यक्ष समीरजी बनकर, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, माजी सभापती बबन मनवे, महादेव पाटील, छाया म्हात्रे, नगराध्यक्ष असहल कादिरी, उपनगराध्यक्ष सुनील शेंडगे, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पी.आय.उध्दव सुर्वे, कृषी अधिकारी राजेंद्र ढगारे , मंगेश साळी विस्तार अधिकारी दिघिकर, महिला अध्यक्षा सोनल घोले, रेश्मा कानसे, अनिल बसवत, सतिश शिगवण, भाई बोरकर, शाहिद उकवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा.तटकरे यांनी २०१४ चे अगोदर कृषी उत्पन्न आयात करणारा आपला भारत देश, कृषी प्रधान होऊन पिकवलेला शेतीमाल निर्यात करू लागला हा आपल्या देशाचा सन्मान आहे.
देशात शेती उत्पादन वाढवण्यासाठी खरे योगदान माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि खा. शरद पवार यांचे आहे, त्यांनी त्या त्या वेळी शेतीविषयक घेतलेले निर्णय आणि शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनतीची तितकीच जोड असल्याचे सांगून, पत्रकारांच्यावतीने या बळीराजाचा सत्कार केला जातो,हे कौतकास्पद असल्याचे मा खा.तटकरे पूरस्कार वितरण प्रसंगी सांगितले.
www.massmaharashtra.com 
बातम्यांसाठी संपर्क करा – रायगड प्रतिनिधी 9834102351

ताज्या बातम्या