लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनाम्यास सुरुवात.आमदार शामसुंदर शिंदे यांनी पंचनामे करण्याच्या दिल्या होत्या सूचना.
( लोहा विशेष प्रतिनिधी / रियाज पठान )
नांदेड दि. 22/9/2020
मागील काही दिवसांपासून लोहा व कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले होते .वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले सोयाबीन, ज्वारी ,मूग, उडीद ,कापूस,ऊस आदी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई तात्काळ देण्याची मागणी लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे
आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर व नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांना भेटून निवेदन देऊन केली होती, वरिष्ठ पातळीवर आमदार शामसुंदर शिंदे यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई तात्काळ देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला असता ,अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार चे तहसीलदार मांडवगडे यांना अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने नुकसान ग्रस्त झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते .काल मंगळवारी लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर व कंधार चे तहसीलदार मांडवगडे यांनी महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी यांना अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या लोहा व कंधार तालुक्यातील शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित शेतीचे पंचनामे करण्यास महसूल विभागाच्यावतीने प्रत्यक्ष सुरुवात झालेली असल्याने आमदार शामसुंदर शिंदे यांच्या वेळोवेळीच्या पाठपुराव्याला यश आले असून, लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.