मौजे खामगाव येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रम पारपडला !

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी -प्रा अंगद कांबळे ]
दि. 12/08/2022 रोजी तालुका कृषी अधिकारी म्हसळा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा म्हसळा यांच्या वतीने मौजे खामगाव येथे रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीमती. प्रियंका निंबरे सरपंच खामगाव ग्रामपंचयत, तसेच आत्मा कमिटी तालुका अध्यक्ष म्हसळा, श्री.वेंकटेश तुकाराम सावंत, श्रीम. वैशालीताई सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य रायगड, श्री.नंदकुमार गजानन शिर्के प्रगतशील शेतकरी ताम्हणे शिर्के, तसेच खामगाव ग्रामपंचायत उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 श्री.संतोष पवार – कर्टोली उत्पादक शेतकरी लेप, श्री.रघुनाथ पारावे कनगर उत्पादक शेतकरी सोनगर,  प्रगतशील शेतकरी श्री.बाळकृष्ण सावंत खामगाव, तसेच श्रीमती वनिता खोत सरपंच ग्रामपंचायत खारगाव खुर्द व महिला बचत गट खामगाव, शेतकरी वर्ग उपस्थित होता.
तालुका कृषी अधिकारी म्हसळा श्री राजेंद्र ढंगारे साहेब यांनी रानभाज्या पासून शरीरास मिळणारे जीवनसत्व व त्यांचे उपयोग इत्यादी बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक श्री बी.पी.कदम कृषी पर्यवेक्षक यांनी केले. श्री गणेश प्रकाश देवडे, कृषी सहाय्यक यांनी मान्यवरांचे उपस्थित शेतकरी वर्गाचे आभार मानले.
यावेळी आत्मा बीटीम श्री योगेश महाले, कृषी सहाय्यक धनंजय सरनाईक, कृषी सहाय्यक श्रीमती. कल्पना शेळके, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री साळी साहेब, श्री शिंदे साहेब उपस्थित होते. ग्रामस्थ्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या