बेळकोणी बु. येथे बिलोली तालुका कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायंस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय किसान दिवस साजरा.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली तालुक्यातील बेळकोणी बु येथे दि.23 डिसेंबर 2022 रोजी नृसिंह मंदीराच्या सभागृहात राष्ट्रीय किसान दिवस हा तालुका कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केद्रं सगरोळी व रिलायन्सं फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनाची माहीती तालुका कृषी अधिकारी जे.डी.पवार व डॉ.संतोष चव्हाण यांच्या उपस्थित संपन्न झाला. 

या कार्यक्रमास बेळकोणीचे सर्व शेतकरी या किसान दिवसा  निमित्ताने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सदरिल या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी बिलोली जे.डी पवार यांनी पंतप्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना बद्दल व राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन महोत्सव सिल्लोड आणि पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या बाबत सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
 कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ .संतोष चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला लागवडी बद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला रिलायन्स फाउंडेशनचे अनिल महाजन उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बेळकोनी बु. येथील उपसरपंच प्रतिनिधी रामकिशन पाटील बुद्धेवार यांची उपस्थिती होती.प्रमुख मान्यवर व कृषी अधिका-यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहायक सज्जन, फुलारी आदीजण उपस्थित होते.
अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी बिलोली तालुक्यातील शेतकरी व बेळकोणी बु.येथील सर्व शेतकरी बांधव सदस्यांनी मोठ्या संख्येनी सहभाग घेतला होता. उपस्थितीत शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बिलोली चे तंत्र अधिकारी सतीश कांबळे यांनी केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या