शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे त्वरित रद्द करा – शिवानंद पांचाळ नायगांवकर
नायगांव प्रतिनिधी :- ८ डिसेंबर २०२०
केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधायक बिल या कायद्याला रद्द करावे, शेतीमालाला मालाला हमी भाव जाहीर करावा शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा २०२०,कंत्राटी शेती कायदा २०२०,अत्यावश्यक वस्तू कायदा हा कायदा ,व ईतर शेती हितार्थ शेतकरी या, व, आंदोलकांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात यावेत ८ डिसेंबर भारत बंद, व दिल्ली येथे होत असलेल्या आंदोलनाला समर्थन, कृषी विधेयकांला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आंदोलनास काही दिवसे झाले आहेत या कडाक्याच्या थंडीत विचार न करता देशाच्या काही राज्यातील शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत, मात्र आपले माय बाप केन्द्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक असलेल्याचे दिसुन येत आहे.
भारत हा देश किसान ( शेतकरी) या ममहत्त्वाच्या अधार स्तंभावर उभा आहे, या देशातील लोकांना आज जर स्वस्त दरात अन्नधान्य मिळत असेल तर ते या देशातील शेतकऱ्यांमुळे, तरी आपण देशातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या मागण्या समजून केन्द्र सरकार ने लोकसभेत मंजूर केलेली तीन विधेयक रद्द करावेत अश्या मागण्यांसाठी या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
या मागणी चे पत्र सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी तहसीलदार नायगांव यांच्या मार्फत दिले,व निवेदनाची प्रत माहिती स्तव पोलीस निरीक्षक नायगांव यांच्याकडे देऊन देशाचे राष्ट्रपति,व प्रधानमंत्री यांच्या कडे आग्रह मागणी केले आहे.
यावेळी आमच्या न्यूजशी बोलताना शिवानंद पांचाळ नायगांवकर म्हणाले की, शेतकरी म्हंटले की पहिले शेतकऱ्यांचा बळी राजाचं आठवतो कारण शेतकरी म्हणजेच रयत आणि रयत म्हणजेच प्रजा असा जगाला संदेश देणारे पहिले राजा तेच होय, म्हणून या केन्द्र सरकार ने शेतकरी विधेयक कायदे त्वरित रद्द करून शेतकर्यांना दिलासा द्यावा हिच मागणी कायदा रद्द करें पर्यंत राहील..