घुंगराळा येथे दिं. 22 डिसेंबर रोजी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या उपस्थितीत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन – आयोजक वसंत सुगावे पाटील यांची माहिती!

 [ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव बाजार येथे दिं.22 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वा. घुंगराळा येथील कृषिरत्न हायटेक नर्सरी येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन मेळाव्यात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख व अकोला येथील फळबाग व भाजीपाला तज्ञ अमोल मलकापुरे हे तज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस तथा मेळाव्याचे आयोजक वसंत सुगावे पाटील यांनी केले आहे.
    या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर उपस्थित राहणार असून या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हानिरीक्षक आशाताई भिसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच या मेळाव्यास ना.जि. म.स.बँकेचे मा.अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस रमेश देशमुख शिळवणीकर, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सदस्य कल्पनाताई डोंगळीकर,  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस डी. बी. जांभरूणकर, डॉ.परशुराम वरपडे, डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मवार, गजानन पापंटवार, सुभाषराव गायकवाड, पांडुरंग गोरठेकर, भास्कर पा. भिलवंडे , उमरी पंचायत समितीचे मा.सभापती शिरीष गोरठेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गोरठेकर, धर्माबाद तालुकाध्यक्ष हणमंत पा.जगदंबे, देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई,मुदखेड तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर,मुखेड तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव, बिलोली तालुकाध्यक्ष नागनाथ पा.सावळीकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व फ्रंट चे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे असे आवाहन मेळाव्याचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, कृषिरत्न हायटेक नर्सरी चे संचालक शितल पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाचिटणीस पंढरी पा.डाकोरे , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष केरबा रावते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव बेंद्रीकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेश ढगे यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या