रो.ह.यो अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीच्या प्रस्तावास मान्यता देऊन बिल देत नसल्यामुळे देगावच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव पंचायत समितीचें तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीचे वेळोवेळी जिल्हाधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी करून ही अद्याप बिले देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे बिल तत्काळ देण्यात यावे अन्यथा दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे दिला आहे.

तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले गोविंद गंगाराम मोरे यांच्या शिवारातील गट क्रमांक ४६४ मधील जमिनीत रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे विहिरीचे बांधकाम शासनाचा एकही हप्ता न उचलता स्वखर्चाने पूर्ण करण्यात आले.
परंतु नायगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष झाले असताना सुद्धा अद्याप तरी सदरच्या विहिरीचा एकही हप्ता शेतकरी लाभधारकांच्या बँक खात्यात पडला नसल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होऊन अखेरचा पर्याय शोधत तीस ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे
देगावचे शेतकरी गोविंद पाटील मोरे यांच्या विहिरीच्या बिलासाठी नायगाव पंचायत समितीकडे अनेक वेळा चकरा मारून सुद्धा तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांनी दिले नसल्यामुळे व सदरचे जेई बिले काढण्यासाठी शेतकऱ्याकडून ५० हजार रुपयाची मागणी करत असल्याचा आरोप देगावच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारीसह नायगावच्या तहसीलदारांना व पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात केला असून सदरची विहीर जाय मोक्यावर जावून पाहणी करूनच बिल देण्यासाठी आदेशित करावे 25/082022 रोजी बिले नाही दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे गोविंद पाटील मोरे यांनी दिला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या