शेतकऱ्याची अडवणूक थांबवा – प्रा.रविंद्र वसंतराव चव्हाण

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शासनाच्या वतीने विविध माध्यमातून अनुदान मिळालेल्या पैसे देण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्याची आडवणूक होत असल्यामुळे आडवणूक न करता खात्यावरील होल्ड काढून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी बँक मॅनेजर कडे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी केली आहे.
येथील राष्ट्रीयकृत बँकेतील शेतकऱ्यांना विविध स्वरूपाच्या अनुदान शासन स्तरावरून त्यांच्या खात्यात जमा होत असताना हाताला आलेली पिके दुष्काळामुळे गारपिटीमुळे नुकसान झालेली पिके या स्वरूपामध्ये अनुदान शासन शेतकऱ्यांना देत आहे आणि बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड मारुन शेतकऱ्याची आडवणूक केली असता नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी स्वतः बँकेत जाऊन मॅनेजरची चर्चा केली. आणि शासनाला विनंती बजा इशारा दिला अनुदान स्वरूपात आलेले पैसे शेतकऱ्याच्या खात्यात पडत असताना शासन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे.
त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे होल्ड काढावे अशी सूचना बँकेच्या सर्व मॅनेजरला करण्यात अली. यावेळी बँकेच्या मॅनेजरने आलेल्या शेतकऱ्यांचे होल्ड काढून सहकार्य केले. यावेळी बालाजीराव मदेवाड साहेब,माणिक पाटील चव्हाण,बंटी पाटील शिंदे ,बैस कोलंबीकर,होल्ड मारलेले विविध शेतकरी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या