परतीच्या मुसळधार पावसाने सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत

( नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी )
नायगाव तालुक्यात सतत परतीच्या मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे हाताला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला.

दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी सतत संकटात पडला असून यावर्षी शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन महागा मोलाचे बियाणे खत शेतात सोयाबीनचे पेरणी केली.

शेतात काढण्यासाठी आलेल्या सोयाबीनच्या कापण्याच्या वेळीच अचानक नायगाव तालुक्यात सतत मुसळधार अवकाळी परतीचा पाऊस पडल्यामुळे ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याच्या नशिबी दिवाळीवर संक्रांत आली की काय अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये मिळत असून यावर्षीची दिवाळी कशी करावी या चिंतेत सापडला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या