म्हसळा येथे कृषी व पशु संवर्धन शेतकरी मेळावा संपन्न !

[ रायगड/म्हसळा – प्रतिनिधि प्रा.अंगद कांबळे ]

कृषी व पशु संवर्धन शेतकरी विभागा मार्फ़त म्हसळा तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गासाठी न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा शालेय सभागृहामध्ये शेतकरी मेंळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. लोकनेते श्री सुनिलजी तटकरे साहेब हे उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थितीत मा.श्री.बबन मनवे सभापती कृषी व पशु संवर्धन जि.प अलीबाग, सौ.उज्वलाताई सावंत – सदस्य प.स म्हसळा, मधुकर गायकर – सदस्य प.स म्हसळा, श्री.संदीप चाचले –  उपसभापती प. स. म्हसळा, सौ छायाताई लहू म्हात्रे – सभापती प.स म्हसळा, श्री भाऊसाहेब गावड़े – ता. कृषी अधिकारी, श्री कदम साहेब – सहा. गटविकास अधिकारी प.स म्हसळा, श्री वाय एस प्रभे साहेब – गटविकास अधिकारी (उ. श्रे )प.स म्हसळा, समीर बनकर, अलीशेठ कौचाली, सौ कापरे ताई, श्री तरवडे साहेब इ. पाहुणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. प्रा.विनयकुमार सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या