शेतकऱ्यांनी खाते केवायसी करून घ्यावे अन्यथा योजनेसाठी अपात्र ठरणार – तालुका कृषी अधिकारी – एम.डी. वरपडे 

■ वारंवार आवाहन करुनही शेतकऱ्यांचा मिळेना प्रतिसाद

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
                नायगाव तालुक्यातील अजूनही ६५०० हजार शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेअंतर्गत आधार सिडींग व ई केवायसी शिल्लक असून, आधार सिडींग केले नाही तर त्यांची नावे योजनेतून वगळली जाणार असुन तात्काळ ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन नायगाव तालुका कृषी अधिकारी एम.डी.वरपडे यांनी केले आहे.
         नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सन्मान योजनेंतर्गत केवायसी व आधार सीडिंग करणे आवश्यकच आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपले ई केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्यात आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी कृषी विभागाच्या माध्यमातून संबधित कृषी सहाय्यकाने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रसारित करण्यात आलेली आहे.
         परंतु नायगाव तालुक्यातील एकूण ४९६८ शेतकरी ई केवायसी प्रलंबित शेतकरी संख्या असुन बँक खाते आधार संलग्न करण्याची एकूण शेतकरी संख्या १६०८ शेतकरी आहेत. आपल्या गावातील ग्रामपंचायत चे डाटा ऑपरेटर किंवा सार्वजनिक सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आधार क्रमांक पडताळणी करून ही ई केवायसी पूर्ण करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग नाही अशा यादीमध्ये नाव आहे त्यांनी आपला आधार कार्ड घेऊन बँकेत जाऊन बँक खात्याची जोडून घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी आपले खाते पोस्ट ऑफिस मध्येही असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपले खाते के. वाय. सी. आधार लिंक केलेले नाही त्या शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत करणे आवश्यकच असून सर्वच शेतकऱ्यांनी प्रकीया पुर्ण करावी. जे शेतकरी आपले के. वाय. सी. आधार लिंक करणार नाहीत असे शेतकरी २५ सप्टेंबर नंतर योजनेसाठी अपात्र ठरणार असून शासन राबवित असलेल्या विविध योजना लाभासाठी सर्वच शेतकऱ्यांनी आपले के. वाय. सी. आधार लिंक करावे असे आवाहन नायगाव तालुका कृषी अधिकारी एम.डी. वरपडे यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या