आम्ही शेतकरी शेतकरीची व्यथा – रियाज पठाण

मुंग गेले उडीद गेले कपाशी न केली बोम 🙏
काय करू देवा आता सोयाबीनला पण आले कोम 🙏

फाटकं धोतर फाटक खेटर तरी कर्ज काढून पेरलं 🙏
दोन घास भाकरीसाठी लेकराले माग सारल 🙏

लय पाणी झाला
शासन करतो बोम 🙏
काय करू देवा आता
सोयाबीनला आले कोंब 🙏

निसर्ग हा लहरी शासनही
मोठेच खोटे 🙏
गरीब माझा शेतकरी
त्याला कोण तारी🙏

पाण्यामुळे जळून गेलं
भुईमुगाच थोम 🙏
काय करू देवा आता
सोयाबीनला आले कोम🙏

#महाराष्ट्रतील महापूर
मीडिया ला काही दिसेना🙏

😭😭😭😭😭😭😭😭

ताज्या बातम्या