कोकलेगाव येथे व्हि.पी.के. उद्योग समूहाचे वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
व्ही पी के उद्योग समूहाचे अध्यक्ष शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी कोकलेगाव ता.नायगांव येथे दि.24/07/2023 रोजी व्हि पी के उद्योग समूहाच्या वतीने ऊस विकास व दुग्ध व्यवसाय विषयी शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले.

वाघलवाडा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांचे एकरी उत्पादन वाढून आर्थिक विकास व्हावा यासाठी ऊस व्यवस्थापन आणि विविध शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता कोकलेगाव ता.नायगांव येथे ऊस विकास व दुग्ध व्यवसाय विषयी उद्योग समूहाचे चेअरमन मा. श्री मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गावातील जेष्ठ माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री आनंदराव पाटील शिंदे,प्रगतशील शेतकरी सांगवी येथील श्री लक्ष्मण पाटील कदम, व्यंकटराव पाटील मोरे सरपंच, गजानन पाटील जुने माजी सभापती, भगवानराव चव्हाण,व गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या