संविधान जगात सर्वश्रेष्ठ याचा भारतियांना अभिमान असावा – प्रा रवीकांत हनमंते !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरातील अनेक ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला आणी बोध्दी सत्व बुध्द विहार येथे भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असुन याचा सर्व भारतीयांना संविधाना प्रती आदर व अभिमान असला पाहिजे असे प्रा रविकांत हनमंते सर यांनी 26 नोव्हेबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित बोध्दी सत्व बुध्द विहार कुंटूर येथे जागेवर आयोजित कार्यक्रमात संबोधीत करतांना म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठया परिश्रमाने भारतीय संविधान लिहून २६ नोव्हेंबर १९५० या दिवशी भारताला संविधान अर्पण केले तेंव्हापासून खऱ्या अर्थाने भारतात लोकशाहीला सुरूवात झाली. 
भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ असुन आपना सर्वाना संविधाना प्रती आदर व अभिमान असला पाहिजे असे मत प्रा. रविकांत हनमंते भारतीय बौद्ध महासभा नायगाव सचिव यांनी म्हणाले या वेळी दिलीप गजभारे, संतोष हनमंते शेषाबाई हनमंते गणेश कदम सुजाता हनमंते पुर्व हनमंते आरती हनमंते प्रीया हनमंते प्रशांत सर्जे, विकास कदम राजु हनमंते बालाजी हनमंते, प्रशीक हनमंते सोनकांबळे, अनेकानी सहभाग घेतला तसेच .
     संविधान गौरव दिनानिमित्त कुंटूर जिल्हा परिषद हायस्कूल सकाळी १० वाजता संपुर्ण गावात भव्य अशी भारतीय संविधान गौरव रॅली काढण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कुंटूर भारतीय संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर चे मुख्याध्यापक मा संजय सिंग राजपुत सर सर्व कर्मचारी व शिक्षक व शाळेतील विद्यार्थी आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या