आंबेडकर नगर येथे तिन गुणवंत विद्यार्थ्यांचा यचोचित सत्कार

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली येथील ज्ञान अलंकार बौद्ध विहार आंबेडकर नगर येथे बौद्ध बांधवांच्या वतीने दि१६ जुलै रोजी बिलोली तालुक्यातील  अनुसुचित जाती प्रवर्गातील तिन गुणवंत विद्यार्थ्यांथी व विद्यार्थीनीला शाॕल व पुष्प हार टाकून यचोचित सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष बौद्ध गुरु आनंद जी भंतेजी यांच्या उपस्थिती मध्ये पोलिस उपनिरिक्षक आकाश माळगे, कर सहायक परिक्षेच्या परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी भोसले, एस.एस.सी च्या परिक्षेत ९३% गुण मिळवलेली विद्यार्थीनी कु.समिक्षा संजय जाधव, या तिघाचा आंबेडकर नगर येथील बौद्ध उपासक -उपासिका व भिम जयंती मंडळाच्या पदाधिकारी च्या वतीने यचोचित सत्कार केला.

बिलोली देशमुख नगर येथील मा.आकाश माळगे यांनी वडील शिक्षक शंकरराव माळगे यांच्या आशिर्वादाने व भावाने सहकार्य केले असल्यामुळे आकाश हे प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न साकार केले,आणि लोकसेवा आयोगाची परिक्षात उत्तम असे गुण घेऊन पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
सर्वसामान्य गरिब कुटूंबात जन्म घेतलेल्या कु.अश्विनी मधुकर भोसले ह्यांच्या वडिलांची छञ छाया हरवल्या नंतर त्या न डगमगता पुढे शिकण्याची मनाशी जिद्द बाळगून शिकायचे ठरवले त्यावेळी भावाने आपल्या शिक्षणाची परवा नकरता आई सोबत भाजी पाला विकून अश्विनी भोसले यांना पैसे पूरवल्यामुळे त्या शिकून राज्यसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत अश्विनी भोसले हे राज्यात पहीली येऊन कर सहाय्यक पदावर पोहचुन क्लार्क म्हणून सेवा करत आहे ,या साठी श्रय सर्व माझ्या आई व भावास जातो असे आश्विनी भोसले या म्हणाले.

तर तिसरी समिक्षा संजय जाधव हीचे आई -वडील या दोघांची छञछाया हरवले असता समिक्षाचे पालन पोषण व शिक्षण हे नातेवाईनी केले,त्याची जान समिक्षाने ठेवून बुद्धीच्या जोरावर उत्तम शिक्षण घेऊन दहावी च्या परिक्षेत ९३%गुण मिळवले असल्याने तीचे आंबेडकर नगरात गौरव अभिनंदन होत,आहे म्हणून या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व यचोचित सत्कार आंबेडकर नगर येथे बौद्ध बांधवाच्या वतीने केला असता बिलोली ठाणे च्या वतीने पोलिस पोलिस उपनिरिक्षक रायपल्ले मॕडम ,सहा पोलिस निरिक्षक आनद माळाळे, जमादार तथा सहाय्यक पोलिस निरिक्षक नेवानिवृत्त जनार्धन बोधणे ,मुद्दलवाड पोलिस कर्मचारी यांनी आपल्या पुष्प गुच्छ देऊन पूढिल कार्यासाठी शुभेच्छा दिले.
व अनेकानी उपस्थित मान्यवरांनी या तिघांच्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करतांना कौतुकास्पद भाषणे करुन अभिनंदन केले.
यावेळी बौद्ध उपासक उपासिका महिला मंडल सह भिम जयंतीचे पदिधिकारी सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा.धम्मपाल जाधव यांनी केला होता.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या