के.रामलू शाळेत गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        के.रामलु शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या संचालिका रमा ठक्कूरवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर विविध थोर नेत्यांच्या व वीरांच्या वेशभूषेत लेझीम आणि डंबेल्स पथकासह एकता रॅली, मेरी मिट्टी मेरा देश ,चंद्रयान 3, वृक्षारोपण संदेश देणारे दृश्य सादरीकरण करत कुंडलवाडी शहरातून प्रभात फेरी काढण्यात आले. 
           के. रामलु शाळेत शिक्षण घेऊन शासनाच्या विविध पदावर नुकत्याच निवड झालेल्या श्रावणी व्यंकटराव लोलमवाड, एम.बी. बी. एस. साठी पहिल्याच प्रयत्नात जीएमसी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथे निवड, दुर्गा अरविंद शिंदे एनआयटी नागपूर येथे निवड , शिवम नर्सिंग कलमुर्गे एन. आय. टी. नागपूर येथे निवड, तसेच इशिका रुक्माजी करपे ,वैष्णवी रूक्माजी उपलंचवार, तिरुपती मारुती नरवाडे, शुभांगी मोहन गिरगावकर, राजेश्वरी राजेश्वर ठक्कुरवार यांची जीडीएस म्हणून पोस्टात निवड, या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार प्राचार्य टी. नर्सिंगराव, मुख्याध्यापक मठवाले पापया आप्पा, संचालिका रमा ठक्कूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
            यावेळी पालक व्यंकटराव लोलमवाड मु.जि.प.शाळा जारिकोट, अरविंद शिंदे पो.पा.स. तालुका अध्यक्ष.नर्सिंग कलमुर्गे, मोहन गिरगावकर, रुक्माजी उपलंचवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कागळे राजेश तर आभार प्रदर्शन टी. नर्सिंगराव यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या