ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सतत अग्रेसर राहू ! – नगरसेवक डॉ.मोईज शेख

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
बहुजन क्रांती मोर्चा म्हसळा यांच्या वतीने घनसार मॅरेज हॉल दिघी नाका म्हसळा आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी डॉ.मोईज शेख यांनी असे प्रतिपादन केले की, जो पर्यंत ओबीसी समाज एकत्र येत नाही तो पर्यंत समाजाचा विकास होणार नाही. जर विकास आणि न्याय मिळवायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत चळवळ पोहचली पाहिजे, त्यांचे हक्क त्यांना भारतीय घटनेने आरक्षणाच्या माध्यमातून दिलेले आहे.  हे हक्काचं आहे आणि ते मिळालंच पाहिजे आणि त्या साठी आपण समाजा सोबत राहू.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गणेश पाटील होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष मा.असहल कादरी, सुफियान हळदे, मा महादेव पाटील – अध्यक्ष कुणबी समाज, मा.रमेश डोलकर, मा.अब्दुल रज्जाक मेमन, अनिकेत कोळी, युवा कार्यकर्ता उरण, करण गायकवाड, नगरसेवक मा.गजानन साळवी, रामचंद्र पाखड,  ममता जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल नाईक यांनी केले. तर आभार गोविलकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या