इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची मुदत 31 July 2022 अशी आहे, परंतु अद्यापही अनेक लोक (करदाते) हे याबाबत गंभीर नाहीत, मुदतीनंतर दंड लागू शकतो हे माहीत असूनही काहींनी अजूनही इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला दिसत नाही, काही लोक शेवटच्या दोन दिवस किंवा अगदी शेवटच्या दिवशी कागदपत्रे घेऊन येतात व इन्कम टॅक्स भरायला सांगतात, अशावेळी कर सल्लागार ते काम घेण्याचे टाळतात, याचं कारण असे की, काही वेळा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या साईटवर लोड आल्याने साईट व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे अनेकांचे मुदतीत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे शक्य होत नाही, उशीर झाल्याने दंड बसतो,
जर एखादे ITR RETURN FILE करायचे काम घेतल्यास, वरील कारणाने वेळेत इन्कम टॅक्स भरता आला नाही तर दंड लागतो आणि हा दंड करदात्यांना भरावा लागतो याची जाणीव टॅक्स कन्सल्टंट करदात्यांना करून देतात, त्यामुळे दंड भरण्याची जबाबदारी कर सल्लागारांवर येत नाही, तर तो करदात्यावर लादला जातो, यामुळे करदात्यांनी वेळेत आपला इन्कम टॅक्स भरल्यास ही आर्थिक दंडाची वेळ त्यांच्यावर येत नाही, त्यामुळे 31 जुलै 2022 पर्यंत आपण आपले आयकर विवरणपत्र दाखल करावे.
□ संपर्क – प्रा.राहुल पाटील ममदापुरकर (कर सल्लागार)
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy