शहरी व ग्रामीण कलावंताना आर्थिक मद्दत द्यावी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची मागणी

( धर्माबाद तालुका प्रतिनिधी )

: कोरोना व्हायरसचा धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण व शहरी कलावंतांना कार्यक्रमाअभावी फटका बसला असून, 22ं मार्च पासुन कोरोना व्हायरसची साथ पसरून आज पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने संपूर्ण कुटुंब प्रमुख लग्न, जंयती,कव्वाली, लोकनाट्य, भजन,सप्ते, , इत्यादी रद्द करून साध्या पध्दतीने शासनाच्या कायद्याच्या चौकटीत आपले कार्यक्रम उरकवले आहेत .त्यामुळे प्रत्येक कलाकार सात महिन्यापासून घरीच बसून आहे. गेल्या शिजनमध्ये लग्नात व कोणत्याही शुभ कार्यात रसीकांचे व ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू होते , काही मंगल आस्टका व बँन्ड पथक मालकांनी मात्र काही कलावंतांना कामासाठी कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे
तेव्हा शासनाने अशा परिस्थितीत कलावंतांना प्रत्येकी 50,000 आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.

कोरोना महामारी च्या काळात
या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलावंतांना कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही या सात महिन्यात पुर्णपणे वर्षाची होनारी आर्थिक परिस्थिती बिकट आसुन कलाकार आर्थिक संकटात सापडला आहे करिता शासनाने ग्रामीण व शहरी कलवंताना आर्थिक मदत द्यावी यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती नांदेड चे संपर्क प्रमुख विकास जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्माबाद तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
धर्माबाद तालुका प्रमुख भीमशाहीर नारायण सोनटक्के, वंचितचे तालुका प्रमुख गौतम देवके,,गायक भिमराव खंडेलोटे ,वैभव सोनटक्के राजेंद्र सोनटक्के,साईनाथ सिरसागर,शामराव देवके,हर्षवर्धन सोनटक्के विजय वासनिकर प्रकाश खंडेलोटे, गिरीधर बुदिले ,राहुल धावने,विजय हातागळे,राज मिसाळे,, ,शामराव देवके,हर्षवर्धन सोनटक्के विजय वासनिकर, इत्यादी कलाकारांच्या सह्या आहेत.

  

ताज्या बातम्या