आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्य कुटुंबांना साडी चोळी,आर्थिक मदत.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नाम फाउंडेशन च्या प्रयत्नातून डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थसहाय्य व साडी चोळीची मदत केली.
  नाम फाउंडेशन चे तालुका समन्वयक भा,ग ,मोरे, सल्लागार सा,रा जाधव, यांच्या प्रयत्नातून नायगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी सहदेव आबाराव शिंदे पळसगाव ,शंकर मोहनराव भाकरे गडगा, चंपती आनंदा जाधव सातेगाव, यांच्या कुटुंबाना, प्रसिद्ध डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्यावतीने आर्थिक मदत व साडी चोळी देण्यात आले.
यावेळी नायगाव येथील युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण ,डॉक्टर प्रतापराव चव्हाण, नाम फाउंडेशन चे तालुका समन्वयक भा ग मोरे , सल्लागार सा रा जाधव, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, बालाजी शिंदे ,यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे सर्व कुटुंबिय उपस्थित होते या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या