मारहाण प्रकरणी दोन व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे चिरली येथे जुन्या भांडण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी दोन व्यक्ती विरुद्ध कुंडलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 14 रोजी रात्री आठ वाजता साईनाथ भंडारे यांच्या घरा समोर फिर्यादी नागनाथ चांदराव पिंगळे वय 26 वर्ष रा चिरली ता बिलोली यास आरोपी सुरेश पिराजी सूर्यवंशी, जयराम पिराजी सूर्यवंशी दोघेही राहणार चिरली ता बिलोली यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून माझ्या घरासमोर मोटार सायकल का लावली म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत, लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर दुखापत केले व लाथा बुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वरील आरोपी विरुद्ध गु र न 143/2021 कलम 324,504,506,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात बेग हे करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या