घराला आग लागून आर्थिक नुकसान ; दिड लाख रुपये व दिड तोळे सोने जळून खाक !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
            येथील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या गंगाधर यलप्पा देवकर यांच्या नूतन घराचे बांधकाम करण्यात आलेल्या घराला दिनांक 22 रोजी सकाळी 9 वाजता आग लागून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

           कुंडलवाडी येथील आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या मजुरदार गंगाधर यलप्पा देवकर यांच्या पंतप्रधान आवास योजनेतील नूतन घराचे बांधकाम प्रगती पथावर असून,सदरील घराला अचानकपणे दिनांक 22 रोजी सकाळी ठीक 9 वाजता आग लागली त्यात ट्रॅक्टर विकेलेले व मुथुट कंपनीचे फायन्स घेतलेले जवळपास दिड लाख रुपये व दिड तोळे सोने, संसार उपयोगी साहित्यासह शैक्षणिक कागद पत्रासह महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत,त्यामध्ये लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले कुटुंबाचे आहे.
सदरील कुटूंब हे मजुरदार असून घर कामासाठी ठेवण्यात आलेले पैसे जळाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून सदरील घटनेचा पंचनामा लवकरच करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले आहे.या कुटुंबाला शासन स्तरावरून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या