अजयकुमार बनले पेवा गावचे पहिले वकील !

हदगाव :
हदगाव तालुक्यातील मौजे.पेवा येथील रहिवासी असलेले अजयकुमार प्रकाशराव जाधव यांनी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय,नांदेड येथुन एल.एल.बी. ची पदवी 95.17% गुणांसह प्राप्त केली.

अजयकुमार यांचे वडील प्रकाशराव मोतीराम जाधव यांनी त्यांच्या आयुष्यातील मोठ-मोठ्या संकटांना तोंड देत आपल्या पाल्यांना शिकवले. अजयकुमार यांनी आपल्या आई- वडिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवत उच्च शिक्षण घेतले.

शिक्षणासोबत त्यांनी कमी वयातच सामाजिक कार्याची धुरा हाती घेतली, अनेक संघटनेचे नेतृत्व करत त्यांनी स्वतंत्र विचारांची विद्रोही संघटनेची देखील स्थापना केली, आजही ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
अनेक खेडोपाडी-वाडीवस्ती वर जाऊन त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. समाजात वावरत असताना त्यांना सामाजात होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली, हा अन्याय पाहून त्यांनी न्यायदानाचे क्षेत्र निवडले आणि आज ते वकील देखील झाले. जिद्द-अभ्यास-संयम-मनमिळाऊ स्वभाव हे त्यांचे नेतृत्वगुण राहिले आहेत.

गेल्या वर्षी त्यांच्या आजी सरस्वतीमाय व याच वर्षी त्यांचे चुलते से.नि. मुख्याध्यापक आनंदराव पा. यांचे निधन झाले. या यशात मला माझ्या आजी-आजोबा-काका यांची उणीव भासत आहे असे यावेळी अ‍ॅड.अजयकुमार जाधव-पेवेकर यांनी भावोद्गार काढले.

मी माझ्या गावातून पहिला ग्रामसेवक झालो, त्याचप्रमाणे माझ्या मुलाने देखील गावचा पहिला वकील होऊन माझी मान उंचावली,असे प्रकाशराव पा.यांनी अभिमानाने सांगितले.अजयने आमच्या संघर्षाचं चीज केलं, असे त्यांच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले. अ‍ॅड.अजयकुमार यांचा परिवार,गुरुजनवर्ग,मित्रमंडळी तसेच गावकरी मंडळी त्यांचे या यशाबद्दल भरभरून कौतुक करत आहेत.

www.massmaharashtra.com
#मास_महाराष्ट्र #mass_maharashtra

ताज्या बातम्या