चाकूचा धाक दाखवून शिक्षिकेला लुटण्याचा प्रयत्न ; कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली येथील आंतरभारती शिक्षण संस्थेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वसुधा वसंतराव टोंगे उर्फ शैलेजा देशपांडे यांच्या घरात दिनांक 27 रोजी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान एका अज्ञात भामट्या चोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला यासंदर्भात कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंडलवाडी येथील खिडकी वेस येथील रहिवासी वसुधा वसंतराव टोंगे हे दिनांक 27 रोजी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान घरात एकटे टीव्ही पाहत असताना अचानक एक भामटा चोर संरक्षण भिंतीवरून चढून घरात शिरला, व वसुधा टोंगे त्यांच्या गळ्यावर चाकूचा धाक दाखवून “सोना पैसा निकाल” असं म्हणत त्याच्याशी झटापट करू लागला, त्यात वसुधा टोंगे यांनी अत्यंत धाडसाने या भामटा चोराचा प्रतिकार करत त्याच्याशी मुकाबला केला.
या झटापटीत भामट्या चोराने त्यांच्या पोटावर चाकूने वार केले त्यात ते किरकोळ जखमी झाले, त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर भामटा चोर घरातील कुठलीच वस्तू न घेऊन जाता पळून गेला. या घटनेच्या अनुषंगाने वसुधा टोंगे यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.न. 88/ 22 कलम 394 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी हे करीत आहेत,संबंधित घटनेबद्दल वसुधा टोंगे त्यांच्या धाडसाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या