महेंद्र शेठ दळवी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुरूडच्या सर्व अंतर्गत रस्ता विकास कामांकरता एकूण पाच कोटी रुपये निधी मंजूर!

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे, तसेच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून व अलिबाग-मुरुडचे कर्तव्यदक्ष आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुरुडच्या सर्व अंतर्गत रस्ता विकास कामांकरिता एकूण ५ कोटी रुपये एवढा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्या सन्मा.मानसीताई दळवी यांच्या शुभहस्ते व मुरुड-जंजिरा नगरपरिषद माजी नगराध्यक्षा सन्मा.स्नेहाताई (माई) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व ऋषिकांत डोंगरीकर मुरुड तालुका प्रमुख, अशील ठाकूर मुरुड शहर प्रमुख, मनोज कामाने, उप तालुका प्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खालील रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.

▪️ मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील दस्तुरी नाका ते कासकर ते पुरकर ते अतिक खतीब घर रस्ता.

▪️ अन्नपूर्णा बिल्डिंग ते गॅस गोडावून पर्यंत रस्ता.

▪️ गोल बंगला चौक ते रणदिवे आळी ते श्री दत्त मंदिर पायऱ्यापर्यंत रस्ता

▪️ गणेश आळी नाका ते गोल बंगला चौक पर्यंत

▪️ गणेश आळी नाका ते मारुती नाका

▪️ पेठ मोहल्ला (डॉ. किडबाई रस्ता) ते लक्ष्मीखार रस्ता

▪️ गणेश आळी नाका ते शाळा क्रमांक २ ते हायस्कुल रोड ते शाळा क्रमांक १.

इत्यादींवर हा निधी खर्च होईल..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या