भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्याच्या सल्लागार सदस्य पदी माणिकराव लोहगावे यांची निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीच्या सदस्य पदी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 केंद्र शासनाकडून राज्य स्तरावर भारतीय खाद्य निगमची समिती स्थापन करण्यात आली. लोहगावे हे भाजपा पक्षाने आज पर्यंत दिलेली विधानसभा, लोकसभा निवडणूक जबाबदारी निष्ठेने पार पडली. जि.प.सदस्य म्हणून संवेदनशील लोकप्रनिधी म्हणून परिचित आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला केंद्रसरकारकडून राज्यातील गोरगरीबांच्या जीवन आवश्यक अन्न पुरवठा करण्यात येणाऱ्या तसेच त्या अन्नाचा दर्जा, माल साठवून ठेवण्यात येणारे गोडाऊन स्थिती आदी पाहणी करून आवश्यक सुचना करण्याचा अधिकार या समितीला आहे.
अश्या महत्त्वपूर्ण समितीवर सामान्य कुटूंबातील सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करण्याची संधी केंद्र सरकाचे मंत्री पियुष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्य सभा सदस्य पद्मश्री डाॅ. विकास महात्म्ये यांनी मिळवून दिल्याबद्दल माणिकराव लोहगावे यांनी आभार मानले. लोहगावे यांच्या निवडीबदल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शुभेच्छां दिल्या आहेत तर अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या