मागासवर्गीय वस्तीगृहातील जेवणात आळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात पालकात तीव्र संताप

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
येथील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या मागासवर्गीय उपेक्षित विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून सामाजिक न्याय भावनांची निर्मिती झाली परंतु सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्याच्या दुर्लक्षेमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनात भाजीमध्ये आळ्या सापडल्याने विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले असून नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तरी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हनमंते यांनी केली आहे.
                    नायगाव येथील शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे राहण्याची खाण्यापिण्याची व शिक्षणाची उत्तम सोय व्हावी म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून सामाजिक न्याय भावनांची निर्मिती केली परंतु या वस्तीग्रह मध्ये 50 विद्यार्थी पैकी 40 विद्यार्थी उपस्थित होते परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षेमुळे व भोजन देणाऱ्या पुसद येथील व्यंकटेश भोजनालयाच्या कंत्राटदाराच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या भाजीमध्ये आळ्या निघाल्यामुळे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले असून याबाबत निष्क्रष्ट दर्जाचे जेवण व आहार देण्यासंदर्भात बऱ्याच वेळेस तक्रारी होऊनही अधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी पालक वर्ग व नागरिकांतून होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या