बडूर येथील रोपवाटीका (नर्सरी) रोपटे तयार करण्यात उत्कृष्ट; वनविगीय अधिकारी कर्मचारी चे कौतुकास्पद कार्य !

बिलोली तालुक्याचे पर्यावरण वाढीसाठी वनविभागाकडून वनपरिक्षेञात  ४१५०० वृक्ष लागवड करण्यात येणार !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
बिलोली तालुक्यातील मौज बडूर येथे वनपरिक्षेञ विभागातील कर्मचारी रोपवाटीकेत कामावर सज्ज होऊन विविध प्रकारची वृक्ष लागवडीसाठी प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये मातीत साग कलम, बिजा पासुन त्याचे रोप होण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे बडूर येथील रोपविटीका (नर्सरी) उत्कृष्ट असलेले दिसुन आली आहे.

सदरिल बिलोली तालुक्यात पर्यावरण, हवामान चांगले राहिल्यास उत्तम पाऊस होईल व उत्तम शेती होईल आणि नदी, नाले पाण्याने भरुन वाहल्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळेल.म्हणुन बिलोली तालुक्यात येणाऱ्या वनपरिक्षेञात वनविभागाकडून वृक्ष लागवड करुन त्याचे संरक्षण करण्यात येत आहे.
बडूर, बामणी येथील वनक्षेञात वृक्ष लागवडी दरम्यान रोपांची गरज भासत असल्यामुळे बडूर येथील रोपवाटीकेत रोप तयार करण्यात येत आहेत. या रोपवाटीका मध्ये कडूलिंब ९५८, आवळा २९००, साग १४०४२, कौट ५००, शिवूबाभुळ २६६४, सिताफळ ३३६०, करंजी ८५२६ अशी रोपे आहेत. एकूण ४१५०० रोप तयार केलेल्या या रोपवाटीकेसाठी मार्गदर्शन बिलोली वनविभागाचे वनपाल शेख फरिद यांचे होते. तर बडूर वनरक्षक गिरीश कुरुडे यांच्या नेतृत्वाखाली वनमजुर यमुनाबाई कडबे, बालाजी कडबे व आदी कामगार परिश्रम घेत आहेत म्हणून बडूर येथील रोपवाटीका उत्तम व उत्कृष्ट दर्जाची दिसुन येत असल्याने वनपाल शेख फरिद, गिरीश कुरुडे यांचे येथील परिसरात अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या