नायगाव तालुक्यातील पूरग्रस्तासाठी 45 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
                जुलै महीण्यात सतत पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले होते .या बाबत महसूल प्रशासना कडून पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासना कडे पाठविण्यात आला होता नुकसानीपोटी नायगाव तालुक्यातील शेतक-यांसाठी ४५ कोठी ५ लाख ४७ हजार रूपयाचे अनुदान नायगाव तहसीलला प्राप्त झाले असल्याची माहिती तहसीलदार गजानन शिदे यांनी दिली .
              यंदा मृग नक्षत्राच्या सुरवातीला लवकर पाऊस सुरूच झाले नाही दि.२० जुनच्या नंतर तालुक्यातील काही गावांत साधारण पाऊस झाला त्यामुळे शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडीद, तुर, ज्वारी आदीं पिकाची पेरणी केली तर कापसाची लागवड केली. पिकाची उगवण होताच पाऊसाला सुरूवात होऊन विस पंचवीस दिवस सतत धार पाऊस झाला त्यामुळे सर्वत्र नदी नाले तुडूंब भरून वाहुन अनेक शेतात पाणी शिरले व सतत पडलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले.
या नुकसानीची दखल घेऊन राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले होते .आदेशा वरून तलाटी ,ग्रामसेवक ,कृषी साह्यक यांच्या मार्फत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनदरबारी पाठविण्यात आले होते .महाविकास अघाडी सरकार सत्तेवरून पाय उतार झाले व राज्यात शिदे – फडवणीस सरकार सत्तेवर आले .या सरकारने नुकसानीचे अनुदान दुप्पट केले एका शेतक-यांसाठी दोन हेक्टर वरून तीन हेक्टर पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला .
          नायगाव तालुक्यात खरीपाचे ४२ हजार हेक्टर क्षेत्र असुन यंदा अतिपावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील ५३ हजार शेतक-यांसाठी शासनाकडून ४५ कोटी ५ लाख ४७ हजाराचे अनुदान नायगाव तहसील प्रशासना कडे प्राप्त झाले असुन तलाट्या मार्फत गावा गावातील बांधित शेतक-यांची यादी करणे काम सुरू आहे पुढील आठवड्यात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत रक्कम व शेतक-यांची नावे देण्यात येतील अशी माहिती तहसीलदार गजानन शिदे यांनी दिली .अनुदान प्राप्त होताच बॅकेनी वेळ न लावता दिवाळी पुर्वी तालुक्यातील सर्व शेतक-यांचे अनुदान वाटप केले तर शेतक-यांची दिवाळी गोड होईल अशी चर्चा शेतक-यांत होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या