कुंडलवाडीत सात दिवसात 14 कोरोना रुग्ण ; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ; उपाययोजना करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कुंडलवाडी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, गेल्या सात दिवसात 14 कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे यांनी दिली आहे.
 देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉंन व डेल्टा या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यात नांदेड जिल्हात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे,त्याच अनुषंगाने कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गेल्या सात दिवसात 14 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत,त्यात दिनांक 8 जानेवारी एक रुग्ण, 10 जानेवारी दोन रुग्ण, 11 जानेवारी तीन रुग्ण, 13 जानेवारी एक रुग्ण, 14 जानेवारी पाच रुग्ण,आणि दोन रुग्ण आरटीपीसीआर मधून अशी रुग्णसंख्या वाढत आहे.
असे असले तरी हि वाढत असलेली संख्या पाहता शहर व परिसरातील नागरिकांना कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, ना मास्क, ना सॅनिटायझर, ना शारीरिक अंतर या कोरोना नियमाचे खुलेआम पायमल्ली करताना दिसून येत आहेत. अशा गंभीर बाबीकडे नगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होऊन यावर कुठल्याही उपायोजना करताना दिसून येत नाही. वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना नियमाचे कडक अंमलबजावणी शहरात करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या