वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप !

आमदार राजेश पवार आणि पुनमताई पवार यांनी आपल्या संकल्पनेतून यापूर्वीही अनेक उपक्रम राबविले आहे,त्यांच्या या उपक्रमाबद्दल विविध गावातील नागरिक समाधान मानतात.
[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने आणि नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई राजेश पवार यांच्या संकल्पनेतून शेळगाव छत्री,ईकळीमोर, टेंभुर्णी या गावातील रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप दिनांक चार जुलै गुरुवार रोजी करण्यात आले. 

  नायगाव तालुक्यातील मौजे शेळगाव छत्री येथे गावच्या सरपंच चांगुनाबाई अशोक बैलकवाड यांच्या हस्ते आणि पोलीस पाटील प्रतिनिधी सतीश पाटील आनेराये ,चेअरमन माधव पाटील शहापुरे, माजी सरपंच संजय पाटील आनेराये ,तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केल्यानंतर नांदेड येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शेख आणि त्यांच्या सर्व टीमने गावातील लहानापासून ते वृद्धा पर्यंत रुग्णाच्या डोळ्याची तपासणी करून दूरचे आणि जवळचे दिसणारे चष्मे अवघ्या आठवडाभरात देण्यात येतील असे सांगितले, तरी या नेत्र तपासणीत शेळगाव छत्री येथील 384 रुग्णाची तपासणी करण्यात आली.
शेळगाव छत्री येथील माजी सरपंच तथा भाजपा कार्यकर्ते संजय पाटील आनेराये यांनी आमदार राजेश पवार आणि पूनम ताई पवार यांच्या या उपक्रमाबद्दल मनस्वी आभार मानले. यावेळी खुशाल पाटील पांडे, संजय माली पाटील, माधव भाऊराव पाटील आणेराये, माधव ऐंजपवाड, यादवराव पाटील पेदे, गुरुनाथ सालेगाये, किशनराव पांचाळ, वसंत आणेराये, जगन्नाथ पेदे,भास्कर अनेराये, कारागीर गोविंद पांचाळ, राजाराम ऐंजपवाड, बळी पाटील आणेराये ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा नामेवार, ऑपरेटर मलिकार्जुन कुंभार यासह महिला पुरुष यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या