कुंडलवाडीत शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शिवसेना शाखेच्या वतीने हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने शहरात दिनांक 24 ते 28 जानेवारी दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

त्याच अनुषंगाने पहिल्या दिवशी शहरातील व्यंकटेश्वर मंदिर नरागल्ली येथे 262 नागरिकांनी नेत्र तपासणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.तसेच शहरात दिनांक 25 रोजी नांदेड वेस, 26 रोजी कुंडेश्वर मंदिर, 27 रोजी पोलिस स्टेशन समोर, 28 रोजी आंबेडकर नगर व साठे नगर आदी ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिर होणार आहे.
या शिबिरात नागरिकांनी नेत्रतपासणी करून घ्यावे असे अवाहान शिवसेना शहर प्रमुख शंकर कोनेरवार यांनी केले आहे. पहिल्या दिवशीच्या नेत्रतपासणी उद्घाटनाच्या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ.एस एस शेंगुलवार, शिवसेना तालुका प्रमुख विजय मुंडकर, युवा तालुकाध्यक्ष प्रल्हाद कदम, तालुका संघटक व्यंकट गुजरवाड, राजू पाटील शिंपाळकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, नेत्ररोग तज्ञ डॉलक्ष्मण चंदनकर, शहर संघटक साईनाथ पोरडवार, साईनाथ पाशावार, दत्तू कोमुलवार, लक्ष्मण गंगोने आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या