आज सुजलेगाव येथे महारुद्र हनुमान जयंती निमित्ताने डॉक्टरांचे मोफत तपासणी व रक्तदान शिबिर !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील सुलेगाव येथे भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या श्रीमहारुद्र हनुमान जयंती निमित्ताने गुरुकृपा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नांदेड यांच्या वतीने मोफत रोग निदान शिबिर व निदान झालेल्या रुग्णांचे आयोजन करण्यात येणार असून शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करून देण्यात येईल.
सुजलेगाव येथील प्रसिद्ध श्री महारुद्र हनुमान जयंती निमित्ताने अनुभवी व तज्ञ डॉक्टर यांच्या गुरुकृपा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नांदेडच्या वतीने मोफत रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती आज दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार असून यामध्ये नांदेड येथील नामांकित गुरुकृपा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर विक्रम मानुरे, डॉक्टर राहुल कोटलवार, डॉक्टर अजय जयप्रकाश मुंदडा, डॉक्टर प्रमोद तोटेवाड, डॉक्टर विजय पोतदार ,डॉक्टर अभिजीत देशमुख, डॉक्टर सचिन पाटील सुगावकर, डॉक्टर श्रीकृष्ण नवनाथ भोसेवाड, या शिबिरात हृदयरोग, मेंदू मज्जा तंतू, मणक्याचे रोग, त्वचा सौंदर्य, मधुमेह, थायराइड, अस्थिरोग, सांधे व प्रत्यारोपण मणक्याचे विकार, रुट कॅनल मूर्ख दंत रोग, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण राष्ट्रीय क्षीणता कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीने नेत्र रोग निदान आदी विविध रोगांची रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे रुग्णांची शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येईल.
शिबिराचा जास्तीत जास्त तालुक्यातील रुग्णालय फायदा घ्यावा अशी विनंती असे सुजलेगाव महारुद्र हनुमान ट्रस्ट व गावकरीच्या वतीने करण्यात आली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या