नायगाव येथील वडजे हॉस्पिटल मधे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील डॉक्टर वडजे प्रसूती सोनोग्राफी सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शंभर रुग्णांनी तपासणीचा लाभ घेतला.

येथील प्रसिद्ध डॉक्टर वडजे यांच्या सोनोग्राफी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये नांदेड येथील प्रसिद्ध हंबर्डे युरो केअर सर्जिकल सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर प्रमोद शंकरराव हंबर्डे व डॉक्टर मनोज शंकरराव हंबर्डे यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 29 डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते पुरुष महिला मुलं मुले यांच्या किडनीचे विविध आजाराचे तपासणी करण्यात आले.
यामध्ये मूत्र रोग, मुतखड्याचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयाचे कर्करोग, पुरुष वंध्यत्व व नपुसकता आदी आजारावर तपासणी करण्यात आली यामध्ये शंभर रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणीच्या लाभ घेतला ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करावयाचे होते त्यांना 20 टक्के सूट देण्यात आली होती या शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाल्याने गोरगरीब महिला पुरुष मुल मुली यांनी डॉ वडजे व डॉ हंबर्डे या डॉक्टरांची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या