कुंडलवाडीत मोफत स्त्रीरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
      येथील डॉ सब्बनवार यांच्या गंगा क्लीनिकच्या वतीने दिनांक 16 सप्टेंबर रोजी मोफत स्त्रीरोग निदान व औषधी वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात नांदेड येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ स्वाती पुपलवाड आदेलवार यांनी महिलांच्या विविध समस्येवर चिकित्सक उपचार करून निदान केले आहे.
यावेळी डॉ प्रशांत सब्बनवार यांच्या क्लिनिकच्या वतीने डॉ स्वाती पुपलवाड,वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, पत्रकार अमरनाथ कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरास शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या