नायगाव येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध उद्योगपती स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी उद्धवरावजी मेडेवार यांच्या स्मरणार्थ नायगाव तालुक्यातील 52 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
स्वातंत्र्य सैनिक कै उद्धवरावजी मेडेवार हे माजी आमदार कै बळवंतराव चव्हाण यांचे कनिष्ठ विश्वासु मित्र होते. यांच्या सोबत जनता हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काही दिवस काम केले. स्वातंत्र्य सैनिक उद्धवरावजी मेडेवार यांच्या काळात शासनातर्फे आलेले स्वातंत्र्य सैनिकाचे मानधन गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे वाटप करणे आदी उपक्रम राबवत होते.
त्याच अनुषंगाने मेडेवार परिवार यांच्यावतीने स्वातंत्र्य सैनिक कै उद्धवरावजी मेडेवार यांच्या स्मरणार्थ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नरसी येथील भगवान बालाजी मंदिर पद्मावती मंगल कार्यालयात नायगाव तालुक्यातील एकूण 52 गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, हार, मोमेंटो, देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये 27 विद्यार्थी बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य गुण घेऊन उत्तीर्ण झालेले तसेच दहावी परीक्षेत विशेष गुण विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झालेल्या 25 विद्यार्थ्यांचा सन्मान आई-वडिलासोबत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य बालाजीराव बच्चेवार, व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, उद्योगपती श्रीराम सावकार मेडेवार, भागवत सावकार प्रतापवार, डॉक्टर पोलावार, संचालक मार्केट कमिटी श्रीनिवास जवाव्दार, नायगाव आर्य वैश्य समाज अध्यक्ष सतीश मेडेवार, सचिव कपिलेश्वर उपाध्यक्ष गजानन चौधरी, कैलास कवटिककर, महासभेचे जिल्हा सहसचिव सदानंद मेडेवार, वसंतराव मेडेवार, राजेश्वर मेडेवार, सतीश लोकमनवार, रमेश मेडेवार बालाजी येरावार, बालाजी मेडेवार , मोहन सावकार देमेवार, शिवकुमार मेडेवार, विकास बच्चेवार, साईनाथ मेडेवार, पवन गादेवार मनोज अरगुलवार, यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy