बिलोली शहरातील रस्त्यावरील फळ विक्रेते व लहान विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्या !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
शहरातील रस्त्यावरील फळ विक्रेते व लहान विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगर परिषद कडे निवेदन द्वारे व्यापाऱ्यांनी केली आहे. शहरातील राज्यमार्गावर रस्त्यालगत फळ विक्रेते व हात गाडी व्यापारी आपले छोटासा व्यवसाय करून कुटुंबाची उपजीविका भागवत होते.
त्यांच्या कुटुंबाची उपजीविका यावर अवलंबून होती. त्यांची दुकाने दिनांक 14 मार्च रोजी काढण्यात आली त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा हाताचा रोजगार निघून गेल्यामुळे त्यांच्यावर आलेले बे रोजगारी हटवून पर्यायी व्यवस्था करून दिल्यास त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागेल अशा मागणीचे निवेदन बिलोली नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी शंकर नरावाड यांच्याकडे करण्यात आली.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजय कुंचणवार, श्रिनिवास पाटील नरवाडे, इंद्रजीत तुडमे, उमाकांतराव गोपछडे, दिलीप उत्तरवाड, सय्यद रियाज, सय्यद अहेमद, आनंद चंचलवाड, शेख मुस्तफा,माधव बोईनवाड, वैभाव कोंडावार, शेख पाशा, सय्यद शरफोद्दीन, गजानन तुराडे, राजू गायकवाड, शंकर बनसोडे, शेख बाबा सह अनेक जणांच्या स्वाक्ष-या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या