कुंडलवाडी सज्जाला पूर्णवेळ तलाठी द्या ; शिष्टमंडळाची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
     येथील तलाठी सज्जाला पूर्णवेळ तलाठी देऊन शेतकऱ्यांची गैरसोय थांबवण्याची मागणी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांच्या शिष्टमंडळाने बिलोली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांची भेट घेऊन केली आहे.
              बिलोली तालुक्यातील महसुली क्षेत्रापैकी कुंडलवाडी हे मोठे महसूल क्षेत्र असलेले मंडळ आहे.तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने कुंडलवाडी हे सर्वात मोठे शहर आहे.गत अनेक वर्षांपासून कुंडलवाडी सज्जाला पूर्णवेळ तलाठी नाही.सध्या आरळी येथील तलाठी पवन ठकरोड यांच्याकडे कुंडलवाडी सज्जाचा अतिरिक्त कारभार आहे. शेती संबंधातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र व नागरिकांचे इतरही कामे तलाठ्याकडे असतात. यासाठी पूर्णवेळ तलाठी नसल्यामुळे शहरातील नागरिकांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे.
या बाबीची दखल घेत माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांची बिलोली येथील कार्यालयात भेट घेतली.कुंडलवाडी सज्जाला पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी केली.या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी लवकरच कुंडलवाडी सज्जाला पूर्णवेळ तलाठी देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी नायब तहसीलदार रघुनाथसिंह चव्हाण,नायब तहसीलदार शंकर नरावाड, माजी नगरसेवक श्रीनिवास जिठ्ठावार, नरेश सब्बनवार, माजी चेअरमन सयाराम नरावाड,काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप अंबेकर, पत्रकार कुणाल पवारे आदी जण यावेळी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या