जिल्हा परिषद हायस्कूलच्या विकासासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर ; मोहम्मद अफजल यांच्या प्रयत्नाला यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील जिल्हा परिषद हायस्कूल ऊर्दू मराठी माध्यम शाळेचा विकासासाठी जिल्हा परिषद आरळी गट सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या निधीतून पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाले आहे,शाळेच्या विकासासाठी जिल्हा परिषद निधीतून निधी उपलब्ध करून द्यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी यापूर्वी दहा लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी दिले होते.या निधीतून शाळेची नूतन इमारत, सुरक्षाभिंत व रंगरंगोटी, पिण्याचा पाण्याची व्यवस्था आदी विकास कामे करण्यात आले व उर्वरित शिल्लक सुरक्षाभिंत बांधकामासाठी पाच लाख रुपयांचा निधी आता उपलब्ध करुण दिले आहे.
त्यामुळे लवकरच सुरक्षभिंतीचे भूमिपूजन करून शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आसल्याची माहिती मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष मोहम्मद अफजल,उपाध्यक्ष सय्यद फारूख पट्टेदार यांनी देऊन जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचे आभार मानले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या