सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य काय असेल – शिवानंद पांचाळ नायगांवकर
राजकारणातल्या सगळ्या लोकांनी अर्थात आमदार, खासदारांनी आपली घरं भरवली आहेत. पाच- पन्नास पिढ्यांना उडणार नाही एवढी बक्कळ मालमत्ता आपल्या घशात घालुन ठेवलीय. यांच्या सोबत नोकर, चाकर, गाड्या, घोड्या आणि दिमतीला फेकलेल्या तुकड्यावर जगणार्या लाळघोट्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा हाय. ‘छु’ म्हणताच कुत्र्यासारखी इतरांच्या अंगावर धावत जाणारी बिनडोक पोरं नेत्यानी दिलेल्या धा रुपयाच्या भेळीशी इमान राखत हाय. आईबापाला शिव्या देणार्या लाळघोट्या कार्यकर्त्यांचा साहेब म्हणजे जीव की प्राण असतोया. घरी मुलाबाळांना, आईबापाला बायकोला खायला आन् पाणी नसतया पण कार्यकर्ता मात्र साहेबांचे पाय धुऊस्नी पाणी पितय. अगदी साहेबांची अंडरपँट सुध्दा धुवायचं काम हा अत्यंत आनंदाने पवित्र काम समजुन करण्यास तत्पर असतंय.
मग साहेब अशा कार्यकर्त्याला बरोबर हेरतात व सतरंज्या उचलण्यासाठी आपल्या कळपात सामाविष्ट करुन घेतात. कार्यकर्त्यांची खाणं, पिणं, नशा पाण्याची बडदास्त ठेवण्यात येती. कार्यकर्ता मोक्कार खुश होतुय. कार्यकर्ता साळा सोडुन आमदार साहेबांच्या नादाला लागतो. साहेब म्हणजे कार्यकर्त्याचा विठ्ठल असतोय. कार्यकर्ता कामधाम सोडुन देतय. नेत्याचा फोटु घरात चिकटवुन सकाळ संध्याकाळ आरती करतय. कार्यकर्ता कुठे चारचौघात गेला आणि त्याच्या नेत्याबद्दल कोणी वाईट बोललेलं त्याला आढळलं तर हा मानसिक संतुलन गमावुन बसतुय आणि मित्रमंडळीच्या अंगावर धाऊन जातुय. शेदोनशे रुपये खर्च करुन आपल्या मोटारसायकलच्या पुढच्या खोपडीस्नी नेत्याचा एक मस्त फोटु चिकटवतय. नेत्यानी न केलेली काम लोकाले सांगायचा ठेका या कार्यकर्त्यांनी घेतलेला असतुय आणि ते काम तो ईमाने ईतबारे पार पाडीत असतुय. साहेब एक दिवस येऊन याच्या गळ्यात हात घालुन फोटु काढतय आणि हे सालभर लोकांना तेच सांगत फिरतय. याची अवस्था भटक्या कुत्र्यागत झालेली असतेय.
सगे सोयरे नातेवाईक यास्नी किंमत देत नाहीत. असल्या औलादीले जन्माला घालुन अनेक बाप नशिबाले दोष देत बसलेय. बापाला वाटतं आपलं पोरगं वाया गेलय, याचे दोनाचे चार करुन दिले तर धार्यावर येईल. बाप पोरगी पाहायला सुरवात करतयं. पण अशा नेत्याच्या सतरंज्या उचलणार्याला पोरास्नी पोरगी द्यायला सहसा कोणी धजावत नाही. वर्ष निघुन जातात. नंतर नेत्याचं पोरगं मोठं होतं. ते राजकारणात येतं. हा कार्यकर्ता परत त्याच्या सतरंज्या उचलायला तयार होतो. आमच्या नेत्याचं पोरगं, आमच्या नेत्याचं पोरगं म्हणुन त्याले अंगाखांद्यावर खेळवते. आपल्या पोराले घालायले चड्डी नसु देत पण नेत्याचे पोराले पुन्हा एकदा आमदार करायचं हाये आणि त्याच्याकरिता हाडाचं मणी आन् रक्ताचं पाणी करायची तयारी या कार्यकर्त्याची असतीया. नेत्याचे पोराले बड्डे असु देत कार्यकर्ता उपाशी तापाशी त्याचे घरी पाणी भरत असतयां. कार्यकर्ता नेत्याचे पोराची ‘शि’ काढत असतया. कट्टर कार्यकर्त्यास्नी नेत्याबिगर करमत नसतया. नेता म्हणजे त्यास्ना देव असतया आणि नेत्याची आठवण म्हंजी काळजात घुसलेला सुरा असतया. नेता आपल्या ईरियात आल्याची खबरबात लागल्यानंतर हे कार्यकर्ता लुटुलुटु पळत जाऊन गाडीचा दरवाजा उघडतया. नेत्याले खाली घेतय अन् एवढ्या गर्दीत पण फोटु खिचतया. पण कार्यकर्त्यांचं बाप वावरात नांगर हाकतय तव्हा एवढ्या गडबडीत बापाच्या हाती असलेला नांगर धरण्यास कार्यकर्ता पळत नसतया. ते म्हणतय मरूदे जाऊंदेत, म्हातारं करतय करू देत. आमचे म्हातार्याले खुप ऊत हाय. म्हातारं पोटाला चिमटा घेउनस्नी यास कापडं आणतया, जीनची पँन्ट आणतय. पण हे साहेबाले बड्डेस्नी बोलवतया. साह्यभासोबती फोटु काढुन टेटसला ठेवतया. आन जगाला दावतय की पहा माझा आमदार साह्यभांपशी कीती वट हाय. तस पाह्यलं तर साह्यब यास्नी कुत्र्यागत विचारत न्हाय. साह्यब मोठं हुशार असतय की, ते फकस्त मुताया पुरतचं हातात धरतया. पण हे साहेबांची अंडरपँट धुतया. पोरी भाव देत न्हाईत मग पोरींना हुडकत हिंडतया. नेत्याचे फोटु पाकीटात ठेवत. ते म्हणतय नेता माझा जीव की प्राण हायं. याच्यासाठी नेत्याची बायकु म्हंजी व्हयीनी साहेबा हायती. आन् घरची बाई मोलकरीन हाय. नेत्यानी दिलेल्या धा रुपयाच्या भेळीव हे ईळ ईळ जगतया. अखंड मराठी देशामंदी हीच आवस्था हायती म्हणुन खुपच बेकार वाटतया.
लेखक- शिवानंद पांचाळ नायगांवकर
www.massmaharashtra.com