प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचे निधन….

दिनांक – २७|१०|२०२०

जवळपास सहा दशकाहून अधिक काळ उमरी परिसरात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक भवताल समृद्ध करणारे प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचे आज दि. 27 ऑक्टोबर 20 रोजी सकाळी 11 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मागील 3 वर्षापासून ते कर्क रोगाने आजारी होते.

मध्यंतरी ते कोविड 19 positive आले होते. पण त्यांनी कोविड वर मात केली होती. मृत्यु समयी त्यांचे वय83 वर्ष होते. त्यांच्या मागे तीन मुलं एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. निःस्पृह निःस्वार्थ आणि निरागस हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.

ऊच्चविद्याविभुषित असूनही अतिशय साधेपणाने जगणारे प्राचार्य मनूरकर यांनी असंख्य गुणवंत यशवंत विद्यार्थ्याना घडवले. त्यांची कथा कादंबरी कविता वैचारिक या प्रकारात विपूल लेखन केले असून त्यांची 15 पुस्तकं प्रकाशित आहेत. सेवानिवृत्ती नंतर पदरमोड करून त्यांनी गावात वडिलांच्या नावाने वाचनालय सूरू केले.

गोदावरीच्या काठावर असलेल्या मनूर या गावात त्यांनी अनेक संमेलने घेतली. प्राचार्य मनूरकर यांच्या निधनाने एका सेवाभावी पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली…

ताज्या बातम्या