गागलेगावचे सरपंच राजेश्वर पाटील राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानीत !

( बिलोली -:इंद्रजीत डुमणे) तालुक्यातील गागलेगाव येथील सरपंच राजेश्वर पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  राजेश्वर पाटील यांनी आपल्या गावात शासकीय विविध योजना तसेच विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्हात नाव लौकिक मिळवला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यामुळे गागलेगाव येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी गजानन चिंतमवाड, रामचंद्र पाटील तांगडे, संतोष पाटील तमन्ना, इंद्रजीत डुमणे, सुरेश डुमणे, ब्रह्माजी डुमणे, गौतम डुमणे , भास्कर जाधव, नागेश डुमणे, मारुती जाधव, यांच्यासह आदि उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या