जय बजरंगबली विकास पॅनल गागलेगावच्या सरपंच पदासह ग्रा.प.सदस्य पदासाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल

( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणुक आयोगाकडुन घोषीत झाल्यानंतर २८ नोंव्हेबर पासुन प्रत्यक्षपणे निवडणुक प्रक्रियेला सुरवात झाली व दि २ डीसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, या दिवशी गागलेगाव येथील जय बजरंगबली विकास पँनल कडुन सरपंच पदासाठी सौ.जयश्री संतोष तमन्ना यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
तर ग्रा.पं.सदस्य पदासाठी वार्ड क्र.१ मधुन सखुबाई गणपत उमाटे(सर्वसाधारण महीला),श्री हानमंत पिराजी मावले (ईमाप्र),सौ.कविता ज्ञानेश्वर आचेवाड (सर्वसाधारण महीला) व वार्ड क्र २ मधुन श्री बालाजी मल्लु मोगले(सर्वसाधारण),मोईन चाँदसाब शेख (सर्वसाधारण), सौ कविता माधव गादेवाड (सर्वसाधारण महीला) व वार्ड क्र.३ मधुन आनंदा सयाजी उमरे (अ.जा), सौ मिनाश्री मनोहर डुमणे (अ.जा महीला),द्रौपदाबाई सायन्रा बैलवाड (ईमाप्र महीला) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी पॕनल प्रमुख राजेश्वर पाटील व रामराव तमन्ना यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या