नायगांव शहरातील विठ्ठल नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या घरापुढील अर्धवट नाली बांधकाम नायगांव नगरपंचायतीने केले होते, पण ते अर्धवटच केल्याने लोकशाही मार्गाने वरिष्ठाकडे निवेदन देऊन वृत्तपत्रातून प्रसिद्धी केल्याने प्रशासनाची झोप उडाली या सदर प्रकरणात गजानन चव्हाण यांनी प्रशासनास धारेवर धरल्याने अखेर त्या अर्धवट त्या नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले.
सदर विठ्ठल नगर येथील नगरपंचायतीने केलेले अर्धवट नाली बांधकाम दीड महिन्यापूर्वी केले होते परंतु त्याच नगर मध्ये सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ राहत असल्याने व त्यांच्याच घरापुढे खड्डा खोदून ठेवले होते, पावसामुळे तो खड्डा भरल्याने पांचाळ कुटुंबीयांना बाहेर जाणे येणे मुश्किल झाले होते तारेवरची कसरत करावी लागत होती.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून पांचाळ हे सर्वत्र परिचित असल्याने त्यांच्याकडे अनेक व्यक्तींची ये जा नेहमीच राहत असे, येणारा प्रत्येक व्यक्ती कार्यकर्त्यांच्या घरापुढे अंधार कसा काय असाही सवाल पांचाळ यांना करीत होते नगरपंचायतीने आज उद्या करतील म्हणून वाट पाहिली परंतु ते न करण्याच्या तयारीत दिसून आले, याबाबत पांचाळ यांनी भाजपा युवा नेते गजानन चव्हाण यांनाही हे अर्धवट नाली बांधकाम कळविण्यात आले.
अखेर पांचाळ यांनी लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी तहसीलदार नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आल्यावर व सदर अर्धवट नाली बांधकाम प्रकरण सर्वत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यावर आणि त्यातल्या त्यात गजानन चव्हाण यांनीही प्रशासनास धारेवर धरल्याने, अखेर त्या अर्धवट नाली बांधकाम ते पूर्ण करण्यासाठी नगरपंचायतीने नाली बांधकामाला चालू केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy