गजानन पाटील चव्हाण यांनी उभारली वाचन संस्कृतीची गुडी !

[ विषेश प्रतिनिधी – शिवानंद पांचाळ नायगांवकर ]
(नायगाव बाजार दि ३ एप्रिल) नायगांव तालुक्यातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले गजानन पाटील चव्हाण यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शाळाबाह्य विद्यार्थाना शैक्षणिक संस्कार देऊन धार्मिक ग्रंथ, बालकथा, कविता, कादंबरी असे विविध विषयांचे ग्रंथ, वही, पेन देऊन व वाचन संस्कृतीची गुडी उभारण्यात आली.

हा कार्यक्रम राबवण्याचे मुख्य कारण सबंध महाराष्ट्र भारत देशासह विश्वामध्ये कोरोना महामारी च्या काळामध्ये गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थी हा आपल्या अभ्यासापासून शिक्षणापासून चार ते पाच वर्षाने मागासलेला वंचित झाल्या कारणाने महाराष्ट्र शासनास व सर्व विविध पक्षीय नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, यांना हा विषय लक्षात आणून देऊन हा संकल्प आपण सर्वांनी चालू करण्यात यावा असे मत गजानन पाटील चव्हाण यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले.
हा अतिमहत्त्वाचा विषय लक्षात आणून देण्याच्या हेतूने होता
त्या अनेक सामाजिक धार्मिक उपक्रमांतर्गत समाजसेवा करतात आज दत्त नगर भागातील चिमुकल्या मुलाकडून वाचन करून घेतले यामुळे बालकामधील वाचनाची गोडी वाढण्यास मदत होईल व बालमनावर चांगले संस्कार पडतील खरा अर्थाने ज्ञानाची गुडी उभारली या आदर्श उपक्रमांमुळे सर्वत्र कौतुक होत आहे….
या वाचन संस्कृती च्या कार्यक्रमास उपस्थित मा.नगरसेवक देवीदास पाटील बोमंनाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, हरिचंद्र पाटील चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, शेख आदम बाबा, माधव पाटील कल्याण, करीम चाऊस, सय्यद यजाज, सय्यद बाबु मुल्ला, प्रवीण भालेराव, कैलास भालेराव, चंद्रकांत तमलुरे, राजेश चव्हाण सर, विठ्ठल बोरीकर सर, सामाजिक कार्यकर्ता शिवानंद पांचाळ, पत्रकार हनुमंत भाऊ चंदरकर, अतुल मंगरूळे, प्रवीण भाऊ बिरेवार, अशोक पवार, शिवाजी पाटील चव्हाण, दिगांबर पाटील चव्हाण, गणेश देगावे, किरण पाटील मोरे सह उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या