आरळी येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १३ फेब्रुवारी रोजी येथील गजानन महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
१३ रोजी सायंकाळी संस्थेचे अध्यक्ष माननीय हाजप्पा पाटील सुंकलोड साहेब यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून, काढलेल्या मिरवणूक, शोभायात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत केलेल्या भक्ती गीतावरील नृत्याला श्रोते व सद्भक्तांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.

तर मेरा रंग दे बसंती चोला या देशभक्तीपर गीतावर मुलींनी केलेल्या लेझीम नृत्याने देशभक्तीचा रंग भरला, अन् उपस्थित शेकडो श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला.

 

या शोभा यात्रेचे धावते सूत्रसंचालन सहशिक्षक तथा लोकमत पत्रकार बालाजी हिवराळे सर यांनी केले. तर या शोभायात्रेत मु.अ‌. सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय विद्यार्थी, माजी विद्यार्थी, गावातील सर्व भजनी, युवक, युवती, शेकडो पुरुष बांधव व माता भगिनी यांची उपस्थिती होती.

Www.massmaharashtra.com 

 

ताज्या बातम्या