कहाळा शिवारात चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर कुंटुर पोलीसांचा छापा ; 12960 रूपये व 5 मोटरसायकल, मुद्देमालासह सहा आरोपी ताब्यात.

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे कहाळा बु. शिवारात शेतामध्ये जुगार खेळत असताना कुंटुर पोलिसांना माहिती मिळाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12960 रुपये व 5 मोटरसायकल सहित सहा आरोपी ताब्यात घेतले आहेत.
सदर घटना 29/12/2022 रोजी 16:45 वाजता कहाळा बु. शिवारात शेतामध्ये उघडकीस आली.  पोलीस स्टेशन कुंटुर अंतर्गत मौजे कहाळा बु.शिवारात शेतामध्ये जुगार अड्डा राजरोसपणे सुरू होता. कुंटुर पोलिसांना माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय अटकोरे यांनी छापा टाकला. 16 आरोपी खेळत होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्व पळाले होते.
 पो.स्टे कुंटुर हद्दीत मोजे कहाळा शिवारात काही लोक पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. पोलीसांनी सदर ठिकाणी छापा मारून सहा जणाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी 12960/- रुपये जुगाराचे साहित्य व ५ मोटर सायकल असा एकूण 207960/- दोन लाख सात हजार नऊशे साठ रुपये मुद्देमाल सह मिळून आल्याने एकूण 14 आरोपी विरुद्ध कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कार्यवाही १) स.पो.नि महादेव पुरी २) पो.उप.नि अटकोरे संजय ३)पो.ना भार्गव सुवर्णकार ४) शंकर बुध्देवाड यांनी केली. फिर्याद पो.हे.का कंधारे यांनी दिली असून तपास पो.उप.नि अटकोरे करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या